ताजी बातमी - जुलै, ऑगस्टदरम्यान राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येऊ शकते, असा साथरोग तज्ज्ञांचा अंदाज असून त्यापूर्वी ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण करण्याची शासनाने तयारी सुरू केली आहे. तसेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा प्रारंभ १५ मेनंतर करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सध्या केवळ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यासाठी लस केंद्र सरकार पुरवत आहे. ४५ वयाखालील नागरिकांसाठी राज्याला लस मिळवण्यात अनेक अडचणी येत आहेत. लसींची उपलब्धता नाही. कमी लस पुरवठ्यामुळे गर्दी, गाेंधळ होऊ शकतो. म्हणून किमान २५ लाख लस कुप्या राज्याला प्राप्त झाल्याशिवाय सरकार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा प्रारंभ करणार नाही. त्यामुळे किमान १५ मेपर्यंत तरी या गटातील नागरिकांना लस टोचणे शक्य नाही, अशी माहिती टोपे यांनी दिली.
