चंद्रपूर - केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भारतात कोरोनाचा फैलाव झाला आणि पाहता पाहता हा कोरोना संपुर्ण देशभर पसरला, आता कोरोनाची दुसरी लाट सूरु आहे पण केंद्र सरकार मात्र सातत्याने महाराष्ट्र सारख्या राज्यावर अन्याय करत आहे. महाराष्ट्राला महिन्याला १.६ करोड लसींची गरज आहे पण केंद्र सरकार तेवढी लसींची मात्रा राज्याला देत नाहीयेय, दोन दिवसा आधी महाराष्ट्रातील ५० लसीकरण केंद्रे केंद्र सरकारच्या सापत्न वागणुकीमुळे बंद झाले, काल पासून जरी लसीकरण केंद्र सुरू झाली असली तरी जो अडथळा लसीकरण प्रक्रियेत मोदी सरकारमुळे निर्माण झाला त्याचा निषेध करण्यासाठी त्याच बरोबर लोक मरत असतांना लस महोत्सव केंद्र सरकार साजरे करत आहे याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर आणि चंद्रपूर महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्षा सुनीता अग्रवाल यांच्या वतीने तुकुम येथील मातोश्री या लसीकरण केंद्रासमोर आज केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात आली. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राला कोरोनाची गंभीर परिस्थिती बघता, या पुढे नियमित आणि आधीक लसींची मात्रा केंद्र सरकारने द्यावी अशी मागणी या वेळी महिला काँग्रेस च्या वतीने करण्यात आली. भाजप हा एक इव्हेंट प्रेमी पक्ष आहे त्यामुळे कोरोनाची दुसरी भयंकर लाट आलेली असतांना आणि लोक मरत असतांना केंद्र सरकार मात्र लसमहोत्सव साजरा करण्याच आवाहन करत हे अतिशय अमानुष आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी भाजप असे इव्हेंट घेत असतात याचा लोकांच्या जीवनमरणाशी काही संबंध नसतो, त्यामुळे लसमहोत्सव ही एक नौटंकी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी यावेळी केंद्र सरकार वर केली. काही दिवस लसीकरण केंद्र बंद असल्याने आता नागरिकांची झुंबड या केंद्रावर येत आहेत, त्यातून कोरोना पसरण्याचा धोका आणखी वाढला आहे म्हणूनच या पुढे असे लसीकरण केंद्र जर केंद्र सरकार मुळे बंद झाले तर महिला काँग्रेस तीव्र आंदोलन पुढे देखील करणार असा इशारा महिला काँग्रेस कडून देण्यात आला. या वेळी उपस्थित सर्व महिलांनी काळी फित बांधून केंद्र सरकारचा निषेध केला,त्याच बरोबर केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी थाळ्या वाजवून उपस्थित सर्व महिलांनी निषेध नोंदवला.
या आंदोलनाला महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर,महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्षा सुनीता अग्रवाल, ब्लॉक अध्यक्षा शीतल काटकर, उपाध्यक्षा सुनंदा धोबे, कल्पना गिरडकर, उजवला वडस्कर, सुरेखा देवतळे, पूजा मोते, रजनी चन्ने, मंदा सोयाम, वाणी डारला, लीलाबाई, मेश्राम या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.