ताजी बातमी - राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णवाढ चिंताजनक वेगाने होत असल्याने कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'ब्रेक द चेन'अंतर्गत पुढील १५ दिवस राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. राज्यात लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लादले असून बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून ते एक मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संचारबंदी असणार आहे. या काळात अत्यावश्यक कारणाशिवाय लोकांना घराबाहेर पडता येणार नाहीत.
राज्यात लागू करण्यात आलेल्या नव्य निर्बंधानुसार, राज्यात आता 50 ऐवजी 25 लोकांच्या उपस्थिती लग्न सोहळा पार पडेल.
दरम्यान, नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांवर आणि कार्यालया चालकांवर कडक कारवाई केली जाईल असा आदेश देण्यात आला आहे.
लग्नासाठी जास्तीत जास्त २५ जणांना उपस्थित राहता येईल.
लग्नकार्यालयातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असावे, तसेच सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झालेली असावी. चाचणी केलेली नसल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड आणि कार्यालय चालकाला दहा हजार रुपये दंड अंत्यविधीसाठी केवळ २० जणांचीच उपस्थिती असावी.
केवळ जीवनावश्यक वस्तू व सेवांसाठी ईकॉमर्स सेवा सुरू राहतील.
पाच किंवा त्याहून अधिक कोरोना रुग्ण एकाच इमारतीत आढळल्यास ती इमारत मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येईल. या इमारतीत बाहेरच्यांना प्रवेश नसेल.
बांधकाम मजूर राहत असलेल्या ठिकाणचीच बांधकामे सुरू ठेवता येतील.