चंद्रपूर - गेल्या अनेक वर्षांपासून मोहफुले आणि तेंदूपत्ता संकलन करणारे जंगलात आग लावण्याचे काम करीत आहेत,काहीवेळा फायर लाईन लावताना पण दुर्लक्ष केल्यामुळे आग लागते. तापमान जास्त असल्याने आणि हवा जोराने वाहात असल्याने आगी मोठ्या प्रमाणावर दुरवर पसरते. ह्या जंगलात लागणाऱ्या आगीमुळे जंगलातील जैवविविधता, वणांचा दर्जा घटतो आणि आणि जंगलाना पोषक व उपयोगी करोडो किटक आणि अगणित सूक्ष्मजीव मारले जातात.वन्यजीवाना खायला लागणाऱ्या वनस्पती आणि गवत जाळून खाक होते, तापमान वाढल्याने भुजल आणि जलसाठे कमी होतात.ह्या आगीमुळे अनेकदा गावे आणि जंगलातील इमारतींना आगी लागतात ,ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे चिंचपल्ली येथील बांम्बु प्रशिक्षण केंद्र, जे अश्या प्रकारच्या आगीत भस्मसात झाले असण्याची शक्यता आहे.
संपुर्ण महाराष्ट्रात लोक जंगलात आगी लावतात,विदर्भात जणू ही परंपरा सुरू झाली आहे ,शासनाने साटेलाईत आणि वन कर्मचारी ह्याच्या माध्यमातून वनविभागाने आगी लागल्या वर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत असते, परंतु ह्याला अजून यश आले नसल्याचे दिसते.एवढ्या मोठ्या प्रमाणात आगी लागुणही लावणारे पकडल्या जात नाही किंवा पकडले तरी मोठी शिक्षा नाही.ह्यात ज्या परिक्षेत्रात आगी लागल्या तेथील वन कर्मचारी आणि अधिकारी जिमदार धरल्या जात नाही किंवा त्यांना जंगल संरक्षण न केल्याबाबत शिक्षा केली जात नाही.सुट्या असल्या की गावकरी जंगलात आणि वनाधिकारी घरात असतात अशी स्थिती असल्याने जंगलात आग लावने,पार्ट्या करणे सहज सोपे होते.
दरवर्षी जंगलात गेल्यास तेव्हा वन अधिकारी तिथे दिसत नाही आणि सर्वत्र आगी लागलेल्या दिसतात. ह्या होळीच्या निमित्याने चंद्रपुर आणि गडचिरोली, यवतमाळ, जिल्यात आणि महाराष्ट्र तील अनेक वनविभागात आगी लावल्या गेल्या. वनविभागाची गस्त नसणे ,गावकरी आणि वन विभागात सामंजस्य नसणे,शिक्षेची भीती नसणे, तेंदू ठेकेदाराला जबाबदार न धरणे आणि आगी लागल्यास त्या त्या परिक्षेत्रातील वन कर्मचारी आणि अधिकारी दोषी धरल्या जात नसल्याने ह्याकडे दुर्लक्ष होत आहे.वन संरक्षनाची जबाबदारी जर वन अधिकारी ह्यांचेकडे आहे तर जंगलात होणाऱ्या सर्व गैर कामाची जिमदारी सुद्धा त्यांचीच आहे.म्हणून आगी लावणाऱ्या सोबतच वन कर्मचाऱ्यांना दोषी धरण्यात यावे,तरच आगीचे प्रमाण कमी होईल.
ह्याच विषयाला धरून वन विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकारी ह्यांना, सचिवाना आणि मंत्र्यांना तक्रारी करून महाराष्ट्रातील वन विभागाच्या अधीकाऱ्याना दोषी धरण्यात यावे अशी तक्रार ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी केली आहे.
