चंद्रपूर - दिनांक ३१/३/२०२१ ला शिष्यवृत्ती व फी माफी चे ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख वाढवण्यात यावे या करिता नितीन भाऊ भटारकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांचा मार्गद्शनाखाली आणि अभिनव देशपांडे यांचा नेतृत्वात समजा कल्याण सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शुभम बाराहाते विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चंद्रपूर, स्वप्नील सातपुते विधानसभा उपाध्यक्ष, केतन जोरगेवार, धीरज दुर्योधन व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोना विषाणू् चे संकट महाराष्ट्र राज्यामध्ये खुप मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने विद्यार्थांना अर्ज करण्यासाठी खूप त्रास होऊन राहिला आहे. त्यांना शिष्यवृत्ती व फी माफी चे ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता काही महत्वाचे कागदपत्र हवे आहेत ते त्यांना या कोरोणा विषाणू मुळे मिळण्यात उशीर होऊन राहला आहे व असे काही विद्यार्थि आहे ज्यांना कारोना ची लागण झाल्याने शिष्यवृत्ती चे फॉर्म भरण्यासाठी जाणे शक्य नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थाचे हित जोपासण्याच्या दृष्टीकोणातून विद्यार्थ्यांकडून व राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर कडून निवेदन देण्यात आले.
