चंद्रपूर - आज दारुबंदीला 6 वर्षे पूर्ण झाली मात्र या 6 वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील परिस्थिती काय? यावर न्युज34 ने पडोली येथील परिस्थिती जाणून घेतली.
पडोली चौक हा वर्दळीचं ठिकाण आहे, अनेक नागरिक सायंकाळी या ठिकाणी बसची वाट बघत असतात, मात्र या वर्दळीच्या ठिकाणी लच्छु नामक अवैध दारू तस्करांचे बार आहे, होय बार, ते सुद्धा या वर्दळीच्या मुख्य ठिकाणी.
नियोजनबद्ध पध्दतीचे काम आहे दारू तस्करांचे त्या बार समोर ग्राहकांना आणण्याची जबाबदारी काही माणसांना दिली आहे.
नागरिकांना आवाज देत "इंग्लिश की देशी" हे सरळ विचारतात, बार मध्ये प्रवेश केल्यावर एक पडदा आपल्यामध्ये येतो त्यानंतर आपल्याला टेबल खुर्ची, चकना व थंड पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येते.
ग्राहक त्या बार मध्ये येत मनसोक्त दारू पिऊन घरी जातात.
मात्र याचा त्रास त्या चौकात एसटी बसची वाट बघणाऱ्या मुली व महिलांना होतो.
या बारला जणू पोलिसच संरक्षण देत आहे की काय असे चित्रच आपल्या डोळ्यासमोर येत.
या बार च्या अवघ्या 40 मीटर अंतरावर पडोली पोलीस स्टेशन आहे, त्या बार ला पोलिसांची संमती असून पोलिसच त्या बार समोर उभे असतात.
या विदारक दृष्याचं चित्रीकरण केल्यावर news34 ने पडोली पोलीस निरीक्षक कासार यांची भेट घेतली.
यावर पोलीस निरीक्षकांनी उत्तर देत आम्ही कारवाई केली आहे, असे सांगितले मात्र जर पोलिसांनी कारवाई केली तरीसुद्धा ते अवैध बार सुरू कसे? हा प्रश्न विचारला असता त्यांनी आम्ही कारवाई केली, आपल्याला पूर्ण माहिती देऊ असे सांगण्यात आले. पण माहिती न देता उद्या सांगू अशी टोलवाटोलवी केली.
कासार यांना त्या विदारक दृश्याचे चित्रीकरण दाखविल्यानंतर त्यांनी लगेच काही पोलीस कर्मचारी कारवाईसाठी पाठविले व त्याठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांची पळापळ सुरू झाली.
अवैध दारू व्यावसायिकांना असे वर्दळीच्या ठिकाणी खुलेआम दारूविक्री करू देणे हे पडोली पोलिसांच्या संमतीने सुरू आहे.
अश्या कृत्यामुळे आधीच पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत चालली आहे आणि त्यावर पोलीस निरीक्षक कासार यावर भर पाडत आहे.
पडोली पोलिसांनी कारवाई केली असती तर पोलिसांना न जुमानता त्यांनी आपले बार सुरु ठेवले तरी कसे, म्हणजेच खाकी वर्दीची भीती ह्या तस्करांना नाही का? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला.
आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दारुबंदीला 6 वर्षे पूर्ण झाले आहे, या 6 वर्षात कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल, अवैध दारू, हजारो प्रकरण, आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले आहे.
आधी पोलीस कारवाई करीत होते मात्र त्या कारवाईत आता लवचिकता आल्याने लच्छु सारख्या तस्करांची हिंमत वाढत आहे.
पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांनी ही अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी आपले प्राण गमावले मात्र त्यानंतर सुद्धा ही अवैध दारू अविरतपणे सुरूच आहे.
माजी अर्थमंत्री आमदार मुनगंटीवार यांनी दारूबंदी केली मात्र यावर कडक अंमलबजावणी करू शकले नाही, महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन झाले मात्र अवैध दारूवर अंमलबजावणी करण्याऐवजी दारूबंदी उठविण्याचा हट्ट करू लागले.
दारूबंदी हटविण्यासाठी नागरिकांना निवेदन सादर करण्यास सांगितले, नंतर समिती गठीत झाली, 3 ते 4 वेळा पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दारूबंदी हटणार अशी घोषणा केली मात्र ती हवेतच विरली
