चंद्रपूर - दुर्गापूर येथील पद्मापूर मार्गावरील सबएरीया कार्यालयापासून ते शक्तीनगर पर्यंत सुरू असलेल्या मार्गाचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने शिवसेना-युवासेनेच्या वतीने अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला काम बंद करून चौकशी करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.
सदरील मार्गाचे काम गणेश कन्स्ट्रक्शन मार्फत सुरू होते, शिवसेना युवासेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत अधीक्षक अभियंता साखरवाडे यांनी निकृष्ट दर्जाचे काम थांबविण्याचे निर्देश देत चौकशी होईपर्यंत काम बंद असणार अश्या सूचना दिल्या.
वाहनांची वर्दळ असलेल्या पद्मापूर मार्गावर सुरू असलेले निकृष्ट बांधकाम असेच सुरू असते तर काही महिन्यांतच मार्गाची दुर्दशा झाली असती.
मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी युवासेना जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे यांच्या मार्फत निवेदन देत निकृष्ट मार्गाचे काम बंद पाडले.
निवेदन देतेवेळी बबलू कटरे, नागेश कडुकर, सागर धनकसार, अजित पांडे, पवन नगराळे, प्रमोद ननावरे व मनीष उके यांची उपस्थिती होती.
