वरोरा - वरोरा तालुक्यात वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव बघता स्थानिक प्रशासनाने 6 दिवसांचा जनता कर्फ्यु घोषित केला आहे.
कर्फ्यु दरम्यान अत्यावश्यक सेवेसाहित सर्व प्रतिष्ठान पूर्णतः बंद असणार आहे.
मात्र वरोरा तहसिल कार्यालयातील तहसीलदार समवेत तब्बल 12 अधिकारी व कर्मचारी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तहसील कार्यालय वरोरा हे 18 तारखेपर्यंत बंद असणार आहे.
तसेच वरोरा उपविभागीय कार्यालयातील उपविभागीय अधिकारी समवेत 2 कर्मचाऱ्यांचा अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना गृह विलीगिकरणात ठेवण्यात आले आहे. कार्यालयातील उर्वरित कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचे काम सुरू आहे.
तहसील कार्यालय बंद असल्याने नागरिकांनी कार्यालय परिसरात जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.