चंद्रपूर - पोलीस महासंचालक, अप्पर पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र यांनी राज्यातील जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले, सदर आदेशाचे पत्र जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे चंद्रपूर यांना दिले.
पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना वाळू तस्करांवर आळा घालण्याचे निर्देश दिले.
पोलीस निरीक्षक खाडे यांनी अवैध वाळूवर आळा घालण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वात 3 पथके तयार केली होती.
संदीप कापडे यांनी जिल्ह्यातील खबऱ्याची मदत घेत जिल्ह्यातील चंद्रपूर, राजुरा, भद्रावती, सिंदेवाही येथे 10 गुन्ह्यांची नोंद करीत 10 आरोपींना अटक करून तब्बल 73 लाख 72 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जिल्ह्यात वाळू माफियांवर आळा घालण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेतर्फे करण्यात आले आहे.