घुगूस - शहरातील ACC सिमेंट कंपनीत रविवारी अचानक ब्लास्टिंग झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
सिमेंट कंपनीसमोर सर्व कामगार एकटवले होते, अचानक मोठ्या आवाजात ब्लास्टिंगचा आवाज आल्याने काही वेळासाठी नागरिक सुद्धा घाबरले.
ACC सिमेंट कंपनीत असलेला जुना प्लांट प्रिटर - 1 हा मोडकळीस आल्याने कंपनी व्यवस्थापनाने त्याला जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र यासंबंधी कुणालाही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती, त्यामुळे अचानक कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना काही वेळेसाठी बाहेर काढले, व ब्लास्टिंग केली.
ब्लास्टिंगचा आवाज, आणि कंपनीतून निघणारा धूर बघताच नागरिकांना काही दुर्घटना घडल्याचे जाणवले मात्र जुना प्लांटला जमीनदोस्त केल्याचे कळताच नागरिकांनी सुद्धा सुटकेचा निश्वास घेतला.
आता त्या ठिकाणी नवीन प्लांट टाकण्याची कंपनीची तयारी आहे.