चंद्रपूर - राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्य सरकारने 5 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत मिनी लॉकडाउन जाहीर केला असून सर्व सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमावर पूर्णतः बंदी आणली आहे.
यामुळे जिल्ह्यातील आराध्य दैवत माता महाकाली ची ऐतिहासिक यात्रा सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा रद्द करण्यात आली आहे, वर्ष 2020 ला कोरोना विषाणूचा जगभरात प्रवेश झाला, कोरोना विषाणूमुळे लाखो नागरिकांनी आपला जीव गमावला, मात्र वर्ष 2021 ला कोरोनाचा प्रादुर्भाव मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिक असल्याने, नागरिकांनी कोरोना नियम पाळावे असे वारंवार प्रशासनातर्फे सूचना करण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे, या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक महाकाली यात्रा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
या ऐतिहासिक यात्रेमधून अनेक राज्यातून भाविक चंद्रपुरात दाखल होतात, मात्र कोरोना मुळे यावर्षी सुद्धा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंदिर व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनातर्फे भाविकांना आवाहन करण्यात येत आहे की चैत्र पौर्णिमेला आयोजित महाकाली माता यात्रा रद्द करण्यात येत असून नागरिकांनी मंदिर परिसरात प्रवेश करण्याचे टाळावे.