चंद्रपूर - विदर्भात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासन सतर्क झाले असून स्थानिक प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहे.
लग्नसमारंभ कार्यक्रमात 50 नागरिक, विना मास्क असणाऱ्यावर प्रशासनाची कारवाई असे अनेक निर्बंध स्थानिक प्रशासनाने लावले आहे.
मात्र 3 मार्चच्या रात्री शहरातही जटपुरा गेट समोर लग्नाच्या वरातीमध्ये 150 नागरिकांच्या वर उपस्थिती व जटपुरा गेट वर संपूर्णतः वाहतूक व्यवस्था कोलमडून लावल्या गेली, पुढे नवरदेव मागे वरात, वरातीच्या मागे दुचाकी चारचाकी वाहनधारकांची प्रचंड गर्दी, अश्या वेळेस प्रशासनाला ही गर्दी दिसली नाही.
या गर्दीने प्रशासनाची पूर्व परवानगी घेत नागरिकांच्या उपस्थितेचा निश्चित आकडा प्रशासनाला दिला असेल काय?
जटपुरा परिसरात येताच फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करीत शासनाचे नियम धाब्यावर बसविले.
यावेळी नागरिकांची प्रचंड वाढलेल्या गर्दीत कोरोना सारखा भयावह विषाणू सहज प्रवेश करीत सुपर स्प्रेडर बनू शकतो.
प्रशासन मात्र सामान्य नागरिकांवर कारवाई करण्यात व्यस्त असतो तर मग अश्या लोकांवर कारवाईला सूट आहे काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.
पश्चिम महाराष्ट्र असो की मराठवाडा विभाग कोरोना विषाणूचे गांभीर्य स्थानिक प्रशासनाला आहे मात्र चंद्रपूर जिल्ह्यात प्रशासन कोरोनाला गांभीर्याने घेत नाही असे चित्र नेहमी दिसत असते.