चंद्रपूर - शहरातील MIDC भागात Mother Dairy चा चिलिंग प्लांट आहे, विशेष म्हणजे हा चिलिंग प्लांट जिल्ह्यातील सर्वाधिक प्रदूषित भागात आहे, Dairy प्लांट च्या लावण्यासाठी पर्यावरण मंडळाची परवानगी आवश्यक असते, प्रदूषित जागेवर हा प्लांट नको अन्यथा यासाठी परवानगी मिळणे कठीण असते.
मात्र चंद्रपूर MIDC मध्ये हे सर्व नियम धाब्यावर बसवीत हा चिलिंग प्लांट सर्रासपणे सुरू आहे.
याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे 24 डिसेंबर 2020 ला तक्रार केली होती, त्यानंतर क्षेत्रीय अधिकारी कारे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाची चमू 13 जानेवारी 2021 ला त्या चिलिंग प्लांट मध्ये चौकशीसाठी पाठवली, mother dairy च्या चिलिंग प्लांट मध्ये अनेक गोष्टींची तफावत असून त्याबाबत 15 दिवसांच्या आत कारणे दाखवा नोटीस कंपनीला बजावली.
प्रदूषण नियंत्रण विभागाच्या काम न करण्याच्या वृत्तीमुळे तो प्लांट सर्रासपणे सुरू आहे, 1 महिना 15 दिवस उलटले असून सुद्धा mother डेअरी च्या प्लांट वर काही कारवाई केल्या गेली नाही.
जनप्रतिनिधी यांनी तक्रार केल्यावर सुद्धा अधिकारी गंभीर नसून ते जीवघेणे दूध आज बाजारात विकल्या जात आहे, उद्या त्या प्रदूषित प्लांट मधील दुधाने लहान बाळांच्या किंवा नागरिकांच्या आरोग्याला काही हानी झाली तर याचा जबाबदार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असणार आहेत काय?
विधानसभा अधिवेशन आटोपल्यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे चंद्रपूरच्या दौऱ्यावर येत आहे त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे क्षेत्रीय अधिकारी प्रदूषण नियंत्रण विभागाचे कारे यांच्या निलंबनाची मागणी करणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.