चंद्रपूर - शहरातील मुख्य बस स्थानकावर मोबाईल व पॉकेटमार यांची टोळी सक्रिय झाली आहे, बस मध्ये प्रवेश घेताना 5 ते 6 जणांचा घोळका धक्का मारीत चोरी करायला लागले आहे.
मोबाईल व पॉकेटमारीचे अनेक प्रकार मुख्य बस स्थानकावर घडत आहे.
2 तारखेला चंद्रपूर वरून घुगूस जाणाऱ्या बस मध्ये चढत असताना उमेश गुप्ता या युवकाचा विवो कंपनीचा मोबाईल अज्ञातांनी लांबविला, बस मध्ये चढत असताना काही जणांचा घोळका उमेश सह धक्का मारत प्रवेश करू लागला.
बस मध्ये चढल्यावर खिशातील मोबाईल नसल्याचे समजले असता काही जणांची चौकशी सुद्धा करण्यात आली. #news34
मोबाईल चोरी गेल्याची तक्रार करण्यासाठी उमेश गुप्ता रामनगर पोलीस स्टेशनला पोहचले असता काही पोलीस कर्मचाऱ्यांनी मोबाईल हरवला अशी तक्रार द्या चोरी गेला अशी नको म्हणत विनवणी करू लागले मात्र गुप्ता यांनी यासंदर्भात मोबाईल चोरी गेल्याची तक्रार करू लागले.
चंद्रपुरातील मुख्य बस स्थानकाचे काम अनेक महिन्यापासून सुरू आहे, याचा फायदा घेत अनेक टोळ्या या आवारात सक्रिय असतात.
नागरिक एकटे असले की त्याच्या सभोवताल गर्दीने जमा होत चोरी करतात, या बस स्थानकावर आधी पोलीस कर्मचारी असायचे मात्र आता ते सुद्धा कमी प्रमाणात दिसत असतात.