पोंभुर्णा - पोंभुर्णा येथील चेक आष्टा मध्य चांदा वनविभागातील कम्पार्टमेंट क्रमांक 96 राखीव वन क्षेत्रात 4 मार्चला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास 55 वर्षीय पुरुषोत्तम मडावी हे इतर तिघांसह झाडू गवत गोळा करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने मडावी यांचेवर हल्ला चढवीत ठार केले, मडावी यांच्या सहकाऱ्यांनी गावात येत घडलेला प्रकार सांगितला असता याची माहिती वनविभागाला दिली.
वनविभागाने आज सकाळी मडावी यांचा मृतदेह ताब्यात घेतला.
वन्यजीवांचा वावर असलेल्या राखीव क्षेत्रात गावकऱ्यांनी जाणे टाळावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.