घुग्घुस - काही महिन्या आधी घुग्घुस ग्रामपंचायत ला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला व प्रशासक म्हणून तहसीलदार निलेशजी गौंड यांना शासनाद्वारे नियुक्त करण्यात आले व घुग्घुस इथे प्रशासकीय कार्यभार सुरू झाला पण प्रशासकीय अधिकारी आठवड्यातून एक किंवा दोन दिवस येतात त्यामुळे घुग्घुस नागरिकांचे बरेच काम ठप्प पडलेले आहेत. या कामामध्ये फेर फार, आधारकार्ड अपडेट यांसारखे अनेक काम येतात.
घुग्घुस नगरपरिषदेची जनसंख्या जवळपास ५० हजारपेक्षा जास्त असून मागील काही महिन्यांपासून नागरिकांना सतत हा त्रास सहन करावा लागत आहे. घुग्घुस नागरिकांना त्रास मुक्त करण्याकरिता व कायमस्वरूपी प्रशासकीय अधिकारी नेमण्याकरिता चंद्रपूर जिल्हा अधिकारी साहेबांकडे आम आदमी पार्टी घुग्घुस च्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
या मागणी साठी आम आदमी पार्टी, घुग्घुस चे अध्यक्ष अमित बोरकर, प्रणयकुमार बंडी, अभिषेक सपड़ी, विकास खडे,आशिष पाझरे,सारंग पिदुरकर, विनय कादासी, अभिषेक ताल्लापेल्ल उपस्थित होते