चंद्रपूर - शहरातील माना टेकडी परिसरात सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांवर आज सकाळी अस्वलीने हल्ला केला, या हल्ल्यात एक नागरिक चांगलेच जखमी झाले असून परिसरातील नागरिकांनी लगेच त्या अस्वलीला पळवून लावले. #news34
पठाणपुरा, व शहरातील अनेक नागरिक माना टेकडीजवळ सकाळी फिरायला जात असतात.
या घटनेत सुनील लेनगुरे व महेश गुडेट्टीवार जखमी झाले.
मागील आठवड्या भरापासून रॅपिड responsive टीम ला त्या ठिकाणी अस्वलीचा वावर असल्याची माहिती होती, मात्र त्यांनी यावेळी नागरिकांना खबरदार केले नाही.
मात्र त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालं आहे.
पाण्याच्या भटकंती साठी वन्यजीव शहरातील मार्ग निवडतात, याआधी सुद्धा अस्वल शहरात आली होती.