घुगूस - विवाहित युवक अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या प्रयत्नांत असताना घुगूस पोलिसांनी त्याचा प्रयत्न हाणून पाडला.
कंत्राटदाराकडे मिस्त्री म्हणून काम करणारा छत्तीसगड निवासी 21 वर्षीय युवक सुनील नवलु सहाडे याने शहरातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले नंतर लग्नाचे आमिष दाखवीत 15 मार्चला त्या मुलीला सुनील ने घुगूस वरून चंद्रपूरला नेले.
अल्पवयीन मुलगी शाळेला जाण्याच्या बहाण्याने घरून निघत दोघेही चंद्रपूरला पोहचले नंतर बस स्थानकावरून भद्रावती कडे जाणाऱ्या बस मध्ये पोहचले व तिथून आदीलाबाद जाणाऱ्या बसमध्ये बसत आदीलाबाद रेल्वे स्टेशनला पोहचले.
रात्र झाल्यावर सुद्धा मुलगी घरी आली नाही म्हणून मुलीच्या आईने घुगूस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, सहायक पोलिस निरीक्षक मेघा गोखरे यांनी क्षणाचाही विलंब न करता दोघांचेही मोबाईल क्रमांक सायबर सेलकडे देत लोकेशन काढले.
रात्री सपोनि गोखरे यांनी पथक तयार करीत आदीलाबाद कडे रवाना केले, युवक व अल्पवयीन दोघांना पोलिसांनी रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेत दोघांना सकाळी घुगूसला परत आणले.
पोलिसांच्या चौकशीत सदर आरोपी युवक हा आधीच विवाहित असून त्याला 1 मुलगा असल्याची माहिती उघडकीस आली.
सहायक पोलिस निरीक्षक मेघा गोखरे यांच्या समय सुचकतेमुळे आरोपीचा उद्देश पूर्ण होऊ न देता दोघांना ताब्यात घेतले.
आरोपी सुनील सहाडे वर कलम 376 (A), 363 व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई घुगूस पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे व सहायक पोलिस निरीक्षक मेघा गोखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अवदेश ठाकूर, आडे व रंजना नैताम यांनी यशस्वीपणे पार पाडली.