बल्लारपूर - तालुक्यातील मानोरा येथील पॅराकमांडो युवक 25 वर्षीय निखिल श्रावण बुरांडे यांनी आज राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली.
3 वर्षांपूर्वी निखिल सैन्यात दाखल झाला होता, तो आग्रा येथे कार्यरत होता व आग्रा सैन्य कॅन्टोन्मेंट परिवारात निखिल राहत होता.
जवान निखिलने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याच कारण सध्या अस्पष्ट आहे.
निखिल चा मृतदेह दिल्ली वरून आज रात्री नागपूरला पोहचणार असून नागपूर मार्गे बल्लारपूर तालुक्यातील मानोरा त्याच्या गावी पोहचणार आहे. शुक्रवारी निखिल वर अंतिम संस्कार होणार आहे.
निखिल च्या अचानक जाण्यामुळे बुरांडे परिवार शोक सागरात बुडाला आहे.