बल्लारपूर - शहरातील 2 वेगळ्या भागातील राहणाऱ्या युवकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. #news34
बालाजी वार्डातील नगरसेवक नरसय्या एनग्नदुलवार अनेक दिवसांपासून आजारी होते, वडिलांचा दीर्घाआजाराने मृत्यू झाल्याने 28 वर्षीय मुलगा राजू हा प्रचंड अस्वस्थ झाला होता, बुधवारी सायंकाळी राजू ने बाथरूममधील हारपिक चे सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाला.
दुसऱ्या घटनेत रवींद्र वार्डात राहणाऱ्या 26 वर्षीय शुभम राजू बहुरीया याने बुधवारी रात्री आईला वर झोपायला जातो असे सांगितले मात्र शुभमने रात्री घरी गळफास घेतला, ही घटना सकाळी 8 वाजता उघडकीस आली.
आत्महत्येचं नेमकं कारण काय हे अस्पष्ट आहे, पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.