गडचांदूर/सै.मूम्ताज अली:-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात पहिला आंतरराष्ट्रीय उद्योग म्हणजे माणिकगड सिमेंट कंपनी.हा उद्योग या क्षेत्रातील नामांकीत सिमेंट उद्योगातून एक असून गत एक दशकापासून हा प्रकल्प विविध कारणाने विवादित असल्याचे चित्र आहे. उदाहरणार्थ स्थानिकांचे शोषण,अनेक आदिवासींची जमीन हडपने,सार्वजनीक रस्त्यावर अवैध बांथकाम, नियमबाह्य जल संचयन,वन जमीनीवर अवैध चुनखडीचे उत्खनन अशाप्रकारे अनेक प्रकरण असून काही न्यायप्रविष्ठ आहे.असे असताना महसूली अभिलेखात "दि सेंचुरी टेक्स मुंबई" माणिकगड सिमेंटच्या नावात बदल करून "अल्ट्राटेक सिमेंट" च्या नावाने फेरफार घेण्याच्या हालचाली कपंनी प्रशासन करीत असल्याची माहिती आहे.
मात्र याला बाधित व अन्याग्रस्त आदिवासी बांधवांचा प्रखर विरोध असून न्यायप्रविष्ट प्रकरण व प्रशासन तक्रारीचा निपटारा होत नाही,तोपर्यंत कुसुंबी,नोकारी व माईन्स क्षेत्रात फेरफार घेऊ नये.तसेच कृषक,अकृषक,अवैध बांधकाम, उत्खनन व चौथा टप्पा जमीन मागणीवर आक्षेप असून ग्राम सभेत आदिवासींनी जमीन देण्यास नकार देत "आमच्या जमीनी परत करा" यासाठी प्रकरण दाखल केले असून कंपनी विरोधात एल्गारचा इशारा जनसत्याग्रह संघटनेनी दिला असताना १५ मार्च रोजी कुसुंबी येथे आदिवासी जमीन हक्क परिषद होत असल्याची माहिती भावराव कन्नाके,केशव कुळमेथे,मारोती येडमे,रामदास मंगाम यांनी दिली आहे.
