ताजी बातमी - भाजप सरकारच्या काळात वनमंत्री मुनगंटीवार यांनी पर्यावरणाचे संवर्धन करीत राज्यात 33 कोटी वृक्षलागवड करीत विक्रम प्रस्थापित केला होता, मात्र या वृक्ष लागवडीत घोळ झाला याकरिता वृक्ष लागवडीची चौकशी होणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 मार्चपर्यंत समिती तयार करीत 4 महिन्यात वृक्ष लागवडीचा अहवाल सादर करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहे.
या वृक्ष लागवडी साठी 2400 कोटींचा खर्च आला होता, 33 कोटीपैकी 28 कोटी वृक्षारोपण झाले व त्यामधील 21 कोटी झाडे जगत असल्याची माहिती मिळाली आहे, गठीत होणाऱ्या समितीमध्ये राज्यातील विविध पक्षातील आमदारांचा समावेश असणार आहे, 4 महिन्यांनी अहवाल सादर न झाल्यास 2 महिन्यासाठी समितीला मुदतवाढ देण्यात येणार असल्याची घोषणा आज विधानसभेत उपमुख्यमंत्री पवार यांनी केली आहे.