घुगूस - 2 मार्चला शहरातील विठ्ठल मंदिर वार्डात मोठ्या भावाने लहान भावावर ब्लेडने सपासप वार करीत जखमी केले.
या प्रकरणात लहान भावाने पोलीस तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी 28 वर्षीय रवी सुधाकर बिडवाईक याला दारूचे व्यसन असल्याने तो रोज घरी येत भावाला शिवीगाळ करायचा मात्र 2 मार्चला पुन्हा रवी दारू पिऊन घरी आल्यावर लहान भाऊ 24 वर्षीय कुणाल बिडवाईक याला शिवीगाळ करायला सुरुवात केली.
कुणाल ने मोठ्या भावाला शांत बसण्यास सांगितले मात्र रवि ने त्याच न ऐकता रागाच्या भरात कुणाल वर ब्लेडने वार केले.
ब्लेडच्या हल्ल्यात कुणाल हा जखमी झाला होता.
रुग्णालयात गेल्यावर कुणाल वर उपचार करण्यात आले, घडलेला सर्व प्रकार कुणाल ने पोलिसांसमोर बयान केला. #news34
घुगूस पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवित 324, 504 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.
रवि व कुणाल हे दोघे भाऊ मजुरी चे काम करायचे मात्र रवि हा दारू च्या आहारी गेल्याने हा प्रकार घडला अशी चर्चा वॉर्ड वासीयांमध्ये आहे.
