चंद्रपुर:-- महाराष्ट्र गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक व माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गृहमंत्री देशमुख विरोधात पाठविलेल्या पत्राने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
पत्रात गृहमंत्री देशमुख यांनी API सचिन वाझे यांना मुंबईतून महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याकरिता ठेवले होते.
असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी त्या पत्रातून केला.
राजकारणात खळबळ माजविणाऱ्या या बातमीचे पडसाद राज्यभर उमटले, चंद्रपूर महानगर भाजप व महिला आघाडीने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
ठाकरे सरकार पूर्णपणे भ्रष्ट मंत्र्यांच्या भरवश्यावर चालत आहे, असा आरोप यावेळी केला.
जटपुरा गेट परिसरात झालेल्या निषेध आंदोलनात भाजप महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजप महिला आघाडी अध्यक्ष अंजली घोटेकर, नगरसेवक व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.