चिमुर:- चिमुर विधानसभेमधे कांग्रेस पक्षात संघटन वाढविण्यापेक्षा गटबाजी करण्यात पदाधिकारी व कार्यकर्ते व्यस्त दिसत आहेत, चिमुर विधानसभेत सध्या वारजुरकर व वडेट्टीवार गट सक्रिय असून संगठन वाढविण्यापेक्षा पक्षात कुरघोडी करणार्य
करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.
अविनाश अगड़े पक्ष श्रेष्ठीकडे दिलेल्या पत्रात मी जिल्हा महासचिव पदावर कार्यरत असून कांग्रेस पक्षात निष्ठावानपणे काम करत असून पक्षात जर युवक कांग्रेसबद्दल चिमुर क्षेत्रात नवीन निर्णय घेत असताना चिमुर विधानसभा युवक आणि चिमुर तालुका युवक कांग्रेस चे कोणतेही पदाधिकारी यांना विश्वासात न घेता निर्णय घेऊन चिमुर विधानसभेत गटबाजी निर्माण करण्याचे कारस्थान पक्षाकडून होत असल्यामुळे मि राजीनामा देत आहो अशी प्रतिक्रिया अविनाश अगड़े यानी व्यक्त करत जिल्हाध्यक्ष यांचे कड़े राजीनामा पाठविला आहे.
विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी चिमूर युवक कांग्रेस विधानसभा प्रमुख पाटील हे दारू तस्करी प्रकरांत अडकले असताना युवक कांग्रेसने तात्काळ पाटील यांची हकालपट्टी केली व त्याजागी नवीन पदाधिकारी ची नियुक्ती सुद्धा केली असून कदाचित त्या पदासाठी अनेकांनी लॉबिंग लावली असेल व ही बाब अनेकांच्या पचनी न पडल्यासारखी आहे म्हणून कांग्रेस पक्षात सध्या उभी फूट पडली आहे.