साखरवाही - 26 फेब्रुवारीला ग्रामपंचायतीच्या पहिल्या मासिक बैठकीत ग्राम पंचायत सदस्य विनोद खापणे, प्रिया ढवस, कीर्ती कडुकर व भाऊराव कुलमेथे यांनी गावातील नाली सफाईचा मुद्दा उचलत सरपंच नीरज बोंडे यांना चांगलेच धारेवर धरले होते.
गावातील नाल्या घाणीने तुडुंब झाल्या आहे, कोरोना सारख्या भीषण काळात नागरिकांच्या आरोग्याविषयी सत्ताधारी गप्प आहे मात्र सदस्य म्हणून विनोद खापणे यांनी सरपंच बोंडे यांना 15 दिवसात गावातील नालींची सफाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही स्वतः नाली सफाई करू असा इशारा दिला होता.
15 दिवस उलटल्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी 14 मार्चला विनोद खापणे, प्रिया ढवस, कीर्ती कडुकर, भाऊराव कुलमेथे यांनी गांधीगिरी करीत सरपंच बोंडे यांच्या घरासमोरील नाली सफाई उपक्रम राबवित स्वतः सदस्यांनी नालीत उतरत सफाई केली.
ग्रामपंचायत सदस्यांची गांधीगिरी बघताच सरपंच बोंडे यांनी घराला कुलूप लावीत कुटुंबासहित पळ काढला. #news34
ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच यांना 19 मार्चपर्यंत गावातील नाल्यांची सफाई न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला ताला ठोकनार असा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे साखरवाही ग्रामपंचायत ही 9 सदस्यांची असून यामध्ये कांग्रेसचे वर्चस्व असून त्यांचे 5 तर भाजपचे 4 सदस्य आहे.
यावेळी गावातील ग्रामस्थ आशिष वाढई, शुशोधन वानखेडे, भीमराज आल्यावर, युसूफ शेख, कवडू सोयाम, सुधाकर भोगेकर, सुरेश दरवेकर, ईश्वर निब्रड, विशाल पाऊनकर उपस्थित होते.
