गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील हिरापूर ग्रा.पं. ची निवडणूक नुकतीच पार पडली.अत्यंत चुरशीच्या लढतीत शेतकरी संघटना ३, काँग्रेस २,भाजप २,अशाप्रकारे उमेदवार निवडून आल्याची माहिती आहे.दरम्यान हिरापूर येथे ११ मार्च रोजी आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात येथील एका पक्षाच्या विद्यमान महिला सदस्यांनी माजी आमदार अॅड.संजय धोटे यांच्या उपस्थितीत सहकुटुंब व समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याचे कळते.यामुळे सध्या हिरापूर ग्रामपंचायत मध्ये भाजपच्या सदस्यांची संख्या ३ वर पोहोचल्याचे चित्र आहे.
यावेळी कोरपना पं.स.माजी सभापती तथा सं.गां.नि.यो.समितीचे माजी अध्यक्ष संजय मुसळे,हिरापूरचे माजी सरपंच व विद्यमान ग्रा.पं.सदस्या प्रमोद कोडापे, माजी तं.मु.अध्यक्ष विशाल पावडे,रवींद्र आत्राम, वाघमारे गुरुजी, सदानंद टिपले, शेषराव शिलारकर,सोपान शिलारकर, नत्थु गायकवाड,रणजोश सिडाम, कुलदीप पडवेकर,सोमेश्वर जोगी,बंडू शिलारकर, मिलींद खाडे,पांडूरंग ठाकरे,सावन वाघमारे, महेंद्र वाघमारे,अर्जून पंधरे,प्रमोद शंभरकर, विलास कोडापे, दौलत टिपले, मारोती सिडाम,सिकंदर वाघमारे,अनील तुमराम, मधूकर शेंडे, मारोती कोडापे, बाबाराव शिलारकर, मुर्लीधर वाघमारे यांच्यासह भाजप मित्रपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रमुख्याने उपस्थिती होती.
