चंद्रपूर - शहरातील ऐतिहासिक तलाव म्हणजेचं रामाला, मात्र सांडपाणी व दूषित पाण्यामुळे रामाला तलावाला प्रदूषणाचे ग्रहण लागले.
तलावातील मासे सुद्धा शुद्ध हवेसाठी पाण्याच्या वर येत असतात, या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी प्रशासन सुद्धा अपयशी ठरले.
काही दिवसांपूर्वी इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी रामाला तलावाच्या संवर्धनासाठी अन्नत्याग आंदोलन केले 12 दिवस चाललेल्या या आंदोलनात धोतरे यांच्या मागण्या मान्य तर झाल्या मात्र अजूनही प्रशासनाकडून काही हालचाली झाल्या नाही.
दररोज सायंकाळी शहरातील नागरिक, विद्यार्थी या तलावाकाठी फिरायला येतात मात्र तलावातील दूषित पाण्याच्या घाण वासेने आता नागरिकांचे फिरणे कमी झाले.
धोतरे यांच्या आंदोलनाला अनेक नागरिकांचा पाठिंबा मिळाला असला तरी सुद्धा पाठिंबा देणाऱ्यांनी स्वतः कधी या ऐतिहासिक वास्तुसाठी काही केले नाही. #news34
सायंकाळी फिरायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना रामाला तलावाच्या स्वच्छतेची भन्नाट आयडिया सुचली व त्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना रामाला तलावाचे महत्व पटवून देत, समूह तयार करीत दर रविवारी सर्व विद्यार्थी एकत्र येत रामाला तलावातील कचऱ्याची सफाई करू लागले.
आम्ही शहरातील नागरिक असून या ऐतिहासिक तलावाची दुर्दशा आम्हाला बघितली जात नसून यासाठी आम्ही हा पुढाकार घेतला आहे, आमच्या या अभियानाला नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे तेव्हांच आमचं हे अभियान सार्थ होणार अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी यावेळी दिली.
