घुगूस - कोरोना बाधितांची संख्या चंद्रपूर जिल्ह्यात 82 पर्यंत पोहचली असताना अचानक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ही संख्या 1 हजारांच्या जवळपास पोहचली. #news34
देशात कोरोना लसीकरण सुरू असताना सुद्धा कोरोना बाधितांच्या आकड्यात रोज वाढ होत आहे, प्रशासन लसीकरणावर जोर देत असून आता सर्व सामान्यांसाठी नोंदणी करीत लसीकरण सुरू करण्यात आले.
घुगूस शहरातील विविध भागात कोरोना बाधितांचा आकडा हा 20 च्या घरात असून यावर नियंत्रण कसे मिळविता येणार यासाठी घुगूस मधील उद्योगात काम करणाऱ्या सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र घुगूसचे वैधकीय अधिकारी डॉक्टर परमेश्वर वाकदकर यांनी दिली.
घुगूस मध्ये राजीवरतन रुग्णालयात 15 मार्चपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली असून आठवड्यातील 4 दिवस लसीकरण करण्यात येणार आहे.
कोरोना संपला अस कुणीही मनात आणू नये कारण या दुसऱ्या लाटेत अनेक नागरिक बाधित झाले आहे नागरिकांनी गर्दीत जाणे टाळले पाहिजे, मास्क व सॅनिटायझर चा वापर नियमित करावे असे आवाहन डॉ. वाकदकर यांनी केले आहे.
