चंद्रपूर - काही दिवसांपूर्वी जमनजट्टी परिसरात मॉर्निंग वॉक करीता जाणाऱ्या नागरिकांवर अस्वलीने हल्ला करीत जखमी केले होते, पुन्हा त्या अस्वलीने सकाळी 6 वाजताच्या सुमारास लालपेठ येथील निवासी 60 वर्षीय मधुकर आत्राम यांचेवर अचानक हल्ला करीत जखमी केले.
परिसरातील नागरिकांनी आत्राम यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. #news34
महिन्याभरात अस्वलीने नागरिकांवर हल्ला केल्याची ही दुसरी घटना असून वनविभागाने त्या अस्वलीचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी लालपेठ व जमनजट्टी परिसरातील नागरिकांनी केली आहे. #news34
