घुगूस - शहरातील बस स्थानक परिसरात आज दुपारी विचित्र अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले.
घुगूस शहरात बस स्थानकाचे बांधकाम सुरू असल्याने बसेस तात्पुरत्या रस्त्यावर थांबत असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे.
15 मार्चला दुपारी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून चंद्रपूरला येणारी बस क्रमांक एम एच 14 बीटी 0682 घुगूस बस स्थानकासमोरील रस्त्यावर थांबली असता भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक एपी 35 वी 9619 ने बसच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली, धडक इतकी जोरदार होती की बसचा काही भाग अक्षरशः बाहेर आला, या धडकेत बसने समोर उभ्या असलेल्या प्रवासी ऑटोला धडक दिली व त्या ऑटोने दुसऱ्या ऑटोला धडक दिली.
या धडकेत बसमधील 4 प्रवासी गंभीर जखमी झाले. #news34
धडकेनंतर बस चालकाने त्या ट्रक ला थांबवित पोलीस स्टेशनमध्ये चालण्यास सांगितले मात्र ट्रक चालकाने न थांबता घटनास्थळावरून पसार झाला.
यामध्ये भिवापूर निवासी 50 वर्षीय सिद्धार्थ साठे, चंद्रपुरातील 20 वर्षीय युवती तृप्ती सुभाष कन्नाके, शेणगाव येथील 70 वर्षीय जिजाबाई पाचभाई व घाटंजी येथील 32 वर्षीय रवींद्र चलकेलवार यांना अपघातात गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. #news34
बस स्थानकाचे काम सुरू असल्याने वाहतूक पोलिसांनी या वाहतुकीवर नियंत्रण करायला हवे मात्र वाहतूक पोलीस कर्तव्य बजावताना त्याठिकाणी दिसत नाही.
