चिमूर - काही दिवसांपूर्वी ब्रह्मपुरी नगरपरिषद कांग्रेसचे नगरसेवक महेश भर्रे यांच्या घरी अवैध दारूचा साठा मोठ्या प्रमाणात आढळला होता, थेट पालकमंत्री यांच्या विधानसभा क्षेत्रातील कांग्रेस नगरसेवक हा दारू तस्करीच्या गंभीर गुन्ह्यात अडकला होता, आता पुन्हा पालकमंत्री यांच्या पूर्वीच्या विधानसभा क्षेत्रात म्हणजेच चिमूर येथील विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष गौतम पाटील रा. वहाणगाव हे अवैध दारू तस्करी प्रकरणात फरार झाले आहे.
चिमूर तालुक्यातील पळसगाव, पिंपर्डा परिसरात अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता 19 मार्चला सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी विलास निमगडे, सचिन गजभिये, सचिन खामनकर यांचेसह सापळा रचला असता सायंकाळी 4.30 वाजेदरम्यान स्कॉर्पिओ वाहन चालकाने अमराई भडका नाल्यामध्ये वाहनातील दारूच्या पेट्या टाकून पळून गेला.
पोलिसांनी देशी दारू किंमत 1 लाख 46 हजार 400 रुपयांचा माल जप्त करण्यात आला मात्र आरोपी गौतम पाटील फरार झाले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, चिमूर पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे.
अवैध दारू तस्करी प्रकरणात आता राजकीय पक्षातील पदाधिकारी झटपट पैसे कमविण्याच्या नादात चांगलेच गुंतत चालले आहे.
महिन्याभरात कांग्रेस पदाधिकारी अवैध दारू तस्करी प्रकरणात अडकले आहे.
पालकमंत्री वडेट्टीवार ह्या कांग्रेस पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागले आहे.