वरोरा - वरोरा तालुक्यातील टेम्भूर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेत अज्ञातांनी दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली.
शुक्रवारच्या मध्यरात्री अज्ञातांनी बँकेच्या मागील बाजूस असलेली खिडकी गॅस कटर ने तोडत आत प्रवेश केला.
सकाळी नागरिकांना खिडकी तोडल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ वरोरा पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली.
वरोरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत चौकशी सुरू केली आहे.
बँकेतील किती रक्कम अज्ञात चोरांनी लंपास केली यावर सध्या तपास सुरू आहे.
बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला असेलचं, त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.