चंद्रपूर - दारूबंदी नंतर जिल्ह्यात मादक पदार्थांची तस्करी वाढली असून जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी याबाबत गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मादक पदार्थांच्या तस्करी रोखण्याचे निर्देश दिले.
बाळासाहेब खाडे यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक तयार करीत जिल्ह्यात कारवाया सुरू केल्या.
8 मार्चला वरोरा नाका चौकात 25 ग्राम ब्राऊन शुगर लालपेठ निवासी अजय रविदास ला अटक केली, त्याच प्रकरणात नागपुरातून ब्राऊन शुगर तस्कर चित्रा ठाकूर व अन्य एकाला अटक केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी जिल्हा "उडता चंद्रपूर" होणार नाही यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करून अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळू.
11 मार्चला स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की काही व्यक्ती गांजा ची वाहतूक करणार आहे, स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत नागपूर रोडवर दुचाकी वाहनांवर तिघेजण संशयास्पद वाटले असतांना त्यांना अटक करण्यात आली त्याचेंजवळून 6 किलो 240 किलोग्राम गांजा जप्त केला.
यामध्ये गोलू उर्फ निलेश शाहू राहणार अमरावती, शेख हारून शेख मोहम्मद चंद्रपूर व आसिफ शेख मुज्जू अमरावती यांना ताब्यात घेत दुचाकी व गांजा असा तब्बल 1 लाख 35 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, नितीन राऊत, राजेंद्र खनके, जमीर खान पठाण, अनुप डांगे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
