गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने "शहीद क्रांतिवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके" यांची जयंती साजरी करण्यात आली.येथील वीर बाबुराव शेडमाके चौक व राकाँ जनसंपर्क कार्यालय येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी राजूरा राकाँ विधानसभा अध्यक्ष तथा माजी जि.प.सभापती अरूण निमजे,गडचांदूर न.प.उपाध्यक्ष तथा कोरपना तालुकाध्यक्ष शरद जोगी,जिल्हा सचिव प्रवीण काकडे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील अरकीलवार, कोरपना तालुका सचिव प्रविण मेश्राम,कोरपना तालुका उपाध्यक्ष करण सिंग,गडचांदूर शहराध्यक्ष आकाश व-हाटे,सदानंद गिरी,संतोष निखाडे,रोहन कुळसंगे इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
