घुगूस - जिल्ह्यात मागील महिन्यात अनेक प्रकारचे चोरी, घरफोडी चे गुन्हे घडल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना विशेष निर्देश देत या घटनेतील आरोपीना अटक करण्याची जबाबदारी सोपविली.
स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करीत शोधमोहीम राबवली.
शहरातील साईंनगर वार्डात काही दिवसांपूर्वी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास सोन्याचे व चांदीचे दागिने आणि मोबाईल चोरी केल्याची घटना घडली होती.
11 मार्चला स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी अमराई वार्ड घुगूस येथे राहणारे 24 वर्षीय विजय बंडू चटकी यांचेकडे सदर गुन्ह्यात चोरी झालेला माल असल्याची पक्की माहिती मिळाली होती.
स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत विजय चटकी ला अटक केली असता साईनगर वार्डात चोरी केली असल्याची कबुली दिली, आरोपी विजय कडून चोरी केलेले 59 ग्राम सोन्याचे दागिने, 34 ग्राम चांदीचे दागिने व मोबाईल आणि नगदी 9 हजार 500 असा एकूण 2 लाख 80 हजार 381 चा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गदादे, संजय आतकुलवार, चंदू नागरे, अमजद खान, कुंदनसिंग बावरी, प्रशांत नागोसे, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, रवींद्र पंधरे व नरेश डाहूले यांनी यशस्वीपणे पार पाडली.
