चंद्रपूर - 2 मार्चला रात्री 9 ते 10 वाजताच्या सुमारास शहरातील जुनोना रोड जवळील विकतुबाबा मठाजवळ 26 वर्षीय सोनू चांदेकरचा अवघ्या 100 रुपयांसाठी पवन पाटील याने गेम केला.
रामनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात आरोपी पवन पाटील याला 6 तासात बेड्या ठोकण्यात आल्या.
मृतक सोनू चांदेकर ची काही दिवसांपूर्वी कारागृहातून सुटका झाली होती, घटनेच्याया दिवशी आरोपी पवन हा घरी जाण्यासाठी निघाला असता मृतक सोनू ने त्याला थांबवत दारू पिण्यासाठी 60 रुपयांची मागणी केली मात्र पवन ने पैसे नसल्याचे सांगितले व दोघांमध्ये वाद वाढला त्याच रूपांतर मारहाणीत झाले.
दोघांच्या झटापटीत पवन ने चाकुने सोनू वर वार केले या हल्ल्यात सोनू जागीच ठार झाला.
सोनू मृत्यू पावला असल्याची पवनने घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रोशन यादव व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे घटनास्थळी दाखल झाले.
सर्व बाबीचा तपास करीत स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम ने आरोपी पवनला मूल-मारोडा येथून अटक केली.
विशेष म्हणजे मृतक सोनू चांदेकर वर 2 अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.