मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनात चंद्रपूर विधानसभेचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आपला आवाज बुलंद करीत सरकारचे लक्ष चंद्रपूर जिल्ह्यातील समस्येकडे वेधले.
राज्याला मिळणाऱ्या विजेतून चंद्रपूर जिल्हा 30 टक्के वीज उत्पादीत करीत देत असतो.
चंद्रपुरातील जनतेला 200 युनिट पर्यंत मोफत वीज आणि शहरातील पर्यटन स्थळांच्या विकासाला चालना देण्याची मागणी सभागृहात केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान सरकार तर्फे सादर केलेल्या मा. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावाला समर्थन देत चंद्रपुरातील विविध समस्यांना न्याय देण्याची मागणी सभागृहात केली तत्पूर्वी मा. राज्यपालांचे आभार मानले आणि पर्यावरण आणि पर्यटनमंत्री मा. ना. श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांना चंद्रपुरातील पर्यटन स्थळांना भेट देऊन यावर्षीच्या बजेट मध्ये वाढीव निधी देण्याची विनंती केली, चंद्रपुरातील जनता प्रदूषण युक्त वातावरणात राहून राज्याला वीज देण्यासाठी मोठा त्याग करीत आहे अशात शासनाने २०० युनिट पर्यंन्त वीज मोफत देण्याची मागणी पुन्हा एकदा सभागृहात केली.
मागील 7 महिन्यापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड योद्धे वेतनापासून वंचित आहे मागील अनेक दिवसांपासून कोविड योद्धे डेरा आंदोलन करीत आहे, त्यांना वेतन तात्काळ मिळावे यासाठी सरकारने प्रयत्न करावे, रामाला तलावाचे संवर्धन करावे.
आमदार जोरगेवार यांच्या अभिभाषणावेळी भाजप आमदारांनी अनेकदा व्यत्यय आणले मात्र आपल्या वेगळ्या शैलीत जोरगेवारांनी त्यांना चांगलेच फटकारले.