चिमूर - येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुगणाच्या वापरासाठी असलेल्या शौचालयात एक दिवसाचे अर्भक शौचालयाच्या सीट मध्ये सोमवारी सकाळी आढळून आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वार्ड क्र १ ची संडास सफाई करून वरच्या मजल्यावर सफाईसाठी गेला होता दरम्यान रुग्णालयातील महिला कर्मचारी बाथरूम ला गेली असता तीला संडास चोकअप दिसला ही बाब स्वीपरला सांगितली असता स्वीपरने लगेच संडास सिट मध्ये सळाक टाकली असता हात बाहेर आल्याचे दिसले याबाबत वैद्यकीय अधिक्षक यांना माहीती देन्यात आली ही घटना सोमवारी सकाळी साडे आठ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
या घटनेची तक्रार फिर्यादी राजेश सुबराव शेट्टी सफाई कामगार उपजिल्हा रुग्णालय चिपूर यांचे तक्रारीवरून चिमूर पोलीसांनी संडास मध्ये अज्ञात इसमाने नवजात मुलीच्या मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावण्याकरीता उपजिल्हा रुग्णालय चिपूर येथील संडास मध्ये टाकुन अपत्य जन्माचे लपवणूक केलेली आहे अशा इसमा विरुद्ध पोलीसांनी भादवी ३१८ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. #news34
चिमूर पोलिसांनी तात्काळ दवाखान्यात दाखल होत पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे पुढील तपास पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बागाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड यांचे मार्गदर्शनात उपनिरीक्षक अनिस शेख, राजू गायकवाड करीत आहेत.
...............
शौचालयात आढळले काचेचे तुकडे
उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील अनेक महीला डिलेव्हरी व इतर तपासनी येतात मात्र संडासात भ्रृणाला कोंबुन मारल्याची पहीलीच घटना आहे सोयी सुवीधायुक्त असलेल्या रुग्णालयातील वार्ड क्रमांक १ च्या संडासात अर्भकाला बाहेर काढत असताना संडासाच्या बाजुला काच आढळले यावरून शंकेला पेव फुटले आहे या रुग्णालयातील एक दिवसाचे अभ्रक कुमारी माताचे तर नव्हे ना त्या अभ्रकांची नाळ काचेने कापली तर नसावी अशी जर तर चर्चा शहरात सुरु आहे.
.............................
उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिला तपासणीसाठी येतात त्यामुळे रविवारी कोण कोण महिला आल्या होत्या त्याचे रेकोर्ड तपासून व सीसीटीव्ही फुटेज वरून ही महिला नेमकी कोण आहे ते माहीत होईल या संदर्भात चिमूर पोलीसात तक्रार दाखल केली अभ्रकांचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पोलीसांमार्फत तज्ञाकडे पाठवीले आहे.
डॉ गो वा भगत
वैद्यकीय अधिक्षक उप जिल्हा रुग्णालय चिमूर