चंद्रपूर - जिल्ह्यात प्रचंड महत्वाचे प्रश्न आहे, अनेक समस्याने जिल्हा ग्रासला आहे, सध्या शहरात पर्यावरण वादी बंडू धोतरे यांचं अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी तर शासकीय वैधकीय महाविद्यालयातील तब्बल 500 कंत्राटी कामगारांचे 7 महिन्यापासून थकीत वेतनाच्या मागणीसाठी डेरा आंदोलन सुरू आहे.
दर 5 वर्षांनी सरकार बदलते किंवा पुन्हा एकंच सरकार सत्तेत येते मात्र कोणत्याही सरकारच्या काळात निर्भीडपणे आपल्या समस्या मांडायला हव्या त्या मांडल्याच पाहिजे तो हक्क आहे.
भाजप सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याची तिजोरी ठेकेदारांसाठी उघडली, गरज नसतांना सौंदर्यीकरणाचे काम केले, कोट्यवधी रुपयांचे बगीचे, रोड निर्माण केले मात्र त्यावेळी त्यांनी रामाला तलावाचे खोलीकरण का केले नाही? त्यावेळी त्यांना रामाळा तलावाचे संवर्धन महत्वाचे वाटले नव्हते का? असा प्रश्न शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी उपस्थित केला आहे.
रामाळा तलाव हा गोंडकालीन ऐतिहासिक तलाव आहे त्याच संवर्धन गरजेचे आहे, भाजप सरकारमध्ये हेचं पर्यावरण वादी होते त्यावेळी त्यांनी असे आंदोलन का केले नाही? आज महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले मात्र कोरोनाच्या भयावह परिस्थितीमुळे राज्यातील तिजोरीत खणखणाट झाला आहे, ही परिस्थिती पर्यावरण वाद्यांना माहीत असायला हवी, कोरोनाच्या कठीण काळात सरकार नागरिकांच्या पाठीशी आहे व पुढेही राहणारच.
चंद्रपूर मनपातील महापौर यांनी जिल्हाधिकारी यांना तब्बल 50 कोटी निधीची मागणी रामाला तलावाच्या संवर्धनासाठी मागितली, शहरातील रस्त्यांचे खस्ता हाल, प्रभागातील परिस्थिती अत्यंत दयनीय असतांना ही मागणी म्हणजेच शहरातील नागरिकांची जणू थट्टाच आहे, डेरा आंदोलनकर्ते यांचे 7 महिन्यापासून थकीत वेतनासाठी भाजपने निधी का मागितली नाही? कामगारांचे प्रश्न सुटावे यासाठी भाजप पुढाकार का घेत नाही? पर्यावरण वादी यांची B टीम तर नाही की त्यांचा अचानक पुळका भाजपला आला शहरातील विविध समस्येवर कधी न बोलणारे 50 कोटींची मागणी करू लागले.
आजपर्यंत अनेक वाघाचा मृत्यू झाला, जिल्ह्यातील प्रदूषणाने अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे त्यावेळी मात्र हे पर्यावरणवादी पुढे येत नाही अस काय कारण असेल?
आमदार मुनगंटीवार यांनी विनाकारण व गरज नसतांना सौंदर्यीकरण, बगीचे यासाठी निधी उधळला नसता तर आज रामाला तलावाचे संवर्धन झाले असते, इको- प्रो अध्यक्ष बंडू धोतरे यांचं आंदोलन रास्त आहे व त्यांची मागणी लवकर पूर्ण व्हावी यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कळविले आहे.