गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
औद्योगीक नगरच्या नावाने जग प्रसिद्ध कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात सध्या अल्पवयीन बाईकर्सने अक्षरशः हैदोस घातलेला आहे.ही मंडळी वाहतूकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून शहरात सर्रासपणे धिंगाणा घालत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडावे लागत आहे.पोलीसांकडून कारवाईच होत नसल्याने यांना कुणाचाही धाक उरलेला नाही. लहानमोठ्यांच्या जीवास धोका निर्माण झाल्याने अखेर "अल्पवयीन वेगवान बाईकर्सना ब्रेक कधी" अशी याचना त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.असे असताना वाहतुक पोलीस मात्र "मि.इंडिया" बनल्याचे आरोप होत आहे. ठाणेदारांनी याकडे विशेष लक्ष घालून उदभवलेली सदर समस्या त्वरित कायमची निकाली काढावी असे मत व्यक्त होत आहे.
आगोदरच शहरात वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर असून यात अल्पवयीन बाईकर्सनी नागरिकांना कमालीचे हैराण करून सोडले आहे.यांचा आतंक संपणार का ? हा कळीचा मुद्दा बनला असून एकतर यांच्याकडे चालक परवाना नसतात, वाहतुकीचे नियम पाळत नाही,शहरात वनवे असताना उलट दिशेने ये-जा सुरू आहे,खूलेआम डबल व टिबल सिट बसवून बेभान बाईक चालवत असल्याने वाहतुक नियमांची अक्षरशा: ऐशीतैशी होत आहे.अशा परिस्थीतीत दुर्दैवाने जर अपघात घडला तर जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थीत होत आहे."पालक घरी,बालक गाड्या घेऊन रस्त्यावर" सध्याचे चित्र असून भविष्यात घडणाऱ्या दुर्घटनांवर वेळीच आढा बसावा या उद्देशाने शहरातील मुख्य चौकात पोलिसांची नेमणूक करावी आणि सदर जीवघेण्या समस्येपासून निष्पाप नागरिकांची सुटका करावी आशी मागणी करण्यात आली आहे. आता यासंबंधी करवाईला सूरूवात कधी होणार आणि किती दिवस चालणार याकडे सर्वांचे लक्ष लक्ष लागले आहे.
