प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकांनी ग्रामपंचायतीवर आपला दावा केला मात्र सरपंच पदाच्या निवडणुकीत तो दावा फोल ठरला आहे.
मागील 20 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेली नागाडा-चिंचाळा ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेने खिंडार पाडले असून या ग्रामपंचायत मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा सरपंच विराजमान झाला आहे. #News34Chandrapur
सरपंच पदी सौ. रंजिता कांबळे तसेच उपसरपंच पदी सूरज सातपुते विराजमान झाले आहे.
