गोंडपिपरी - पंचायत राज समिती सध्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, जिल्हा परिषदेचा काय कारभार सुरु आहे याबाबत पंचायत राज समिती विविध तालुक्यात जाऊन कार्याचा आढावा घेत आहे, आज गोंडपिपरी येथे हि समिती पोहचली असता समितीचे अध्यक्ष आमदार रायमुलकर प्राथमिक आरोग्य केंद्र आकसापुर येथील ऑक्सिजन सिलेंडरची पाहणी करीत होते. नेमकं त्याचक्षणी सिलेंडरचा पाईप निघाला असता रायमुलकर यांच्या हाताला किरकोळ जखम झाली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कार्डिलें देखील उपस्थित होते सर्व प्रकार त्यांच्यासमोर घडला. पाईप निघाल्याचा आवाज येतात परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत आमदार रायमुलकर यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले.
गावकऱ्यांनी आरोग्य केंद्रातील पशु वैधकीय अधिकारी डॉ. तेलकापल्लीवार हे एकही दिवस कार्यालयात उपस्तित राहत नसल्याची तक्रार केली, गावकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संजय रायमुलकर यांनी गावकऱ्यांना कारवाईचे आश्वासन दिले.
