चंद्रपूर - भानापेठ प्रभागातील बगड खिडकी परिसरातील नालीची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. मागील काही वर्षापासून नालीची पाहणी व देखरेख करण्यासाठी कोणीही आलेला नाही. मनपा व नगरसेवकांच्या दुर्लक्ष मुळे बगड खिडकी परिसरातील नुरी चौक, येथील रहवासी अजीम शेख, मजीद शेख, जाकीर शेख, जावेद शेख, जहांगीर बॅग, नजीर शेख, यांच्या घरासमोरील असलेलीं नाली पूर्णपणे तुटलेली आहे. नालीच्या पाण्यामुळे घाण पसरलेली आहे. त्यामुळे तेथील रहवासी नागरिकांना स्वास्थ संबंधी अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. तरी बगड खिडकी परिसरातील नागरिकांची नम्र विनंती आहे. की, महानगरपालिका ने त्वरित नाली बनवून देण्यात यावी.
चंद्रपूर शहरात पाण्याची बिकट समस्या आहे.पाण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. विशेष करून बगड खिडकी परिसरातील नळ कनेक्शन खूप कमी आहे. तसेच परिसरातील मनपाकडून लावण्यात आलेले हात पंप (बोरिंग) बिघडलेले आहे. तरी आपणास नम्र विनंती करण्यात येते की बगड खिडकी परिसरातील बिघडलेल्या अवस्थेत असलेल्या हात पंप (बोरिंग) लवकरात लवकर दुरुस्त करून देण्यात यावे.
बगड खिडकी परिसरातील विद्युत खांब वरील पथदिव्यांची सोय करून देण्यात यावी. धन दाट लोकवस्ती असलेल्या बगड खिडकी परिसर शहराच्या मध्यभागी आहे. तसेच या प्रभागातून रेल्वेलाईन लागून आहे. या परिसरामध्ये पथदिवे नसल्याने चोरी अथवा अवैध धंद्यांना चालना मिळत आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक या परिसरात फिरताना दिसतात.तरी आपणास विनंती करण्यात येते की या परिसरामध्ये अवैध धंदे व असामाजिक तत्त्व यांचे लोकांमध्ये भय निर्माण झालेले आहे. रात्री फिरत असताना परिसरात काळेकुट्ट अंधार पसरलेला असतो. त्यामुळे असामाजिक तत्त्व या परिसरामध्ये अंधाराच्या गैरफायदा उचलत आहे. लोकांमध्ये असुरक्षेचे व भीतीचे वातावरण परिसरातील लोकांमध्ये पसरलेले आहे. तरी आपण वरील विषयावर त्वरित पावले उचलून पथ दिव्यांची सोय लवकरात लवकर करून देण्यात यावे अशी मागणी परिसरातील लोकांची आहे.
अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव, मोहम्मद कादर शेख यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस विधानसभा सचिव मोनू रामटेके, प्रकाश देशभरतार, अजीम शेख,जावेद शेख, मजीद शेख, सलमान पठाण, शाकीर शेख, गौरव आमटे शिष्टमंडळाने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
