घुगूस - 17 जानेवारीला घुगूस शहरातील शुभम फुटाणे नामक युवक बेपत्ता झाला होता मात्र रात्री शुभमच्या मोबाईलने घरी कॉल आला की तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, मुलगा जिवंत हवा असेल तर 30 लाख रुपये द्यावे लागतील.#News34Chandrapur
पुढच्या व्यक्तीचे शब्द शुभमच्या आईच्या कानी पडल्यावर त्यांना धक्का बसला काय करावं, सुचेना या प्रकरणी त्यांनी घुगूस पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली.
मात्र तब्बल 28 दिवसांनी शुभमचा मृतदेह पोलिसांना मिळाला, आश्चर्याची गोष्ट म्हणजे नोव्हेम्बर महिन्यात 7 वर्षीय विरचे अपहरण करणारा आरोपी शुभमचा मारेकरी निघाला.
पोलिस त्याची सखोल चौकशी करीत आहे, या प्रकरणात अजून किती आरोपी आहे याचा तपास सध्या सुरू आहे.
घुगूस कांग्रेसचे अध्यक्ष राजू रेड्डी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन दिले की या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपी गणेश पिंपळशेंडे याला जाहीर फाशी द्यावी व यामध्ये अजून किती आरोपी आहे याचा सुद्धा तात्काळ शोध पोलिसांनी घ्यायला हवा.
सध्या घुगूस शहर दहशतीखाली असून पोलिसांनी नागरिकांना विश्वास देत अश्या घटना पुन्हा घडणार नाही याची खात्री द्यावी अशी मागणी कांग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांनी केली आहे.
