प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - शुभम फुटाणे अपहरण व हत्याकांड प्रकरणात आरोपी गणेश पिंपळशेंडे ला अटक केल्यावर या प्रकरणात अजून आरोपी असल्याची शक्यता आहे, एकापेक्षा जास्त आरोपींचा या प्रकरणात सहभाग असेल तर त्यांना अटक व्हायला हवी व या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत झाली पाहिजे अशी मागणी घुगूस वासीयांचा कँडल व आक्रोश मोर्चा दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केली.
17 जानेवारीला शुभम फुटाणे या अभियंता मुलाचं अपहरण झालं मात्र पोलिसांना त्याचा काही सुगावा लागला नाही, अपहरणाच्या 28 दिवसानी शुभम फुटाणे चा मृतदेह मिळाला.
या प्रकरणात गणेश पिंपळशेंडे या आरोपीला सुद्धा अटक करण्यात आली आहे मात्र अजून या प्रकरणात कुणी सहभागी आहे का याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी यावेळी करण्यात आली. #News34Chandrapur
कैंडल व आक्रोश मोर्चा शहराच्याया मुख्य मार्गावरून भ्रमण करीत गांधी चौकात शुभमला श्रद्धांजली देण्यात आली यावेळी शहरातील नागरिकांमध्ये रोष होता, घडलेली घटना फुटाणे परिवारात अत्यन्त वेदनादायी आहे त्यांच्या कुटुंबाला आधार मिळो अशी प्रार्थना शहरातील नागरिकांनी यावेळी केली.
आरोपी गणेश पिंपळशेंडे ला फाशी द्यावी अशी जाहीर मागणी नागरिकांनी केली आहे, घुगूस पोलिसांच्या तपासात अजून काय माहिती मिळणार हे 4 दिवसानी कळेलच.
