घुगूस - 28 दिवसांपासून अपहत 22 वर्षीय शुभम फुटाणे याचा मृतदेह 13 फेब्रुवारीला शेणगाव फाट्याजवळील एका लॉन च्या मागील परिसरात मिळाला, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, आजूबाजूचा परिसरात काही जाळल्याचे प्रमाण दिसत होते शुभमला मारल्यावर आरोपीने त्याला जाळण्याचा प्रयत्न केला असावा.
आश्चर्यकारक बाब म्हणजे शुभमला मारणारा दुसरा कुणी नसून त्याचा अभियंता मित्र व 2 महिण्याआधी 7 वर्षीय वीर खारकर या मुलाचे अपहरण करणारा गणेश पिंपळशेंडे निघाला.
शुभमच्या अपहरणानंतर 30 लाख रुपयांची मागणी करणारा फोन शुभमच्या आईला आला होता, त्यानंतर याप्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशनला झाली.
पोलिसांनी सुद्धा कर्तव्य बजावत शुभमचा शोध घेण्यास सुरुवात केली.
मात्र दुसऱ्या दिवशी शुभमची दुचाकी शहरात एका ठिकाणी आढळली त्यावर रक्ताचे डाग होते, पोलिसांनी त्याचे सॅम्पल घेत ते प्रयोगशाळेत पाठविले. #News34Chandrapur
मात्र 28 दिवसानी शुभमचा मृतदेह हाती लागला, पोलिसांना आधीच गणेशवर संशय होता, मात्र त्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल आल्यावर तो संशय राहिला नाही पोलिसांनी गणेशला ताब्यात घेत विचारपूस केली मात्र गणेश हा काही बोलायला तयार नव्हता, पोलिसी खाक्या दाखविताच गणेशने गुन्हा कबूल करीत शुभमला ज्या ठिकाणी मारले ती जागा पोलिसांना दाखवली. शुभमचे अपहरण केल्यावर गणेशने त्याला का मारले, नेमकं काय घडलंय या सर्व बाबीचा शोध घुगूस पोलीस करीत आहे, शुभमच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मात्र या सर्व घडामोडित आता सरळ राजकारणाने एन्ट्री घेतली आहे कारण वीर खारकर अपहरण प्रकरणात वीर च्या वडिलांना घुगूस येथील एका राजकीय पदाधिकाऱ्यांनी समजावीत गणेश ची जबाबदारी आम्ही घेतो तो परत असा गुन्हा करणार नाही, आपण तक्रार मागे घ्यावी.
जेव्हा आपला मुलगा जिवंत आपल्याला मिळाला व गावातील प्रतिष्ठित राजकारणी गणेशाची जबाबदारी घेत असल्याने गणेशवरील तक्रार मागे घेण्यात आली.
त्या राजकीय पदाधिकाऱ्यांची ही चूक शुभमच्या जीवावर बेतली असा आरोप सर्व पक्ष करीत आहे कारण त्यावेळी गणेशवर कारवाई झाली असती तर शुभम आज आपल्यामध्ये असता.
असे मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शुभमच्या हत्येने घुगूस शहरातील नागरिक हादरून गेले आहे याचा रोष त्या राजकीय पदाधिकाऱ्यांवर काढला जात आहे.
