प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - शहरात अंदाजे 15 ते 20 वर्षांनी अपहरण व हत्येचं खळबळजनक प्रकरण उघडकीस आल्याने संपूर्ण घुगूस शहर या घटनेने हादरून गेले आहे.
28 दिवस आधी वेकोली कर्मचारी फुटाणे यांचा 22 वर्षीय मुलगा शुभम फुटाणे घरी आला नसल्याने सर्वांनी त्याचा शोध घेतला मात्र रात्रीच्या सुमारास शुभमच्या घरी निनावी फोन आला त्यावर एका व्यक्तीने तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, मुलगा जिवंत हवा तर 30 लाख रुपये द्यावे लागेल अशी खंडणी मागण्यात आली.
त्यानंतर याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली व घुगूस पोलीस सर्व बाबी तपासून शुभमचा शोध घेऊ लागली मात्र त्याचा सुगावा लागला नाही.
मात्र आज 13 फेब्रुवारीला शुभमचा मृतदेह शेणगाव फाट्याजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळला.
शुभमचा मृतदेह व आरोपी सुद्धा पोलिसांनी पकडला, आरोपीचं नाव ऐकल्यावर घुगूस शहरातील नागरिकांना सुद्धा धक्का बसला आरोपी दुसरा कुणी नसून नोव्हेम्बर महिन्यात 7 वर्षीय वीर चे अपहरण करणारा अभियंता गणेश पिंपळशेंडे हा निघाला.
आरोपी गणेशने मृतक अभियंता शुभम सोबत मैत्री केली व त्याच्याबद्दल संपूर्ण जवळीक निर्माण करीत शुभमचे अपहरण केले.
7 वर्षीय वीर चे अपहरण केल्यावर गणेशने त्याला नागपूरला सोडले, वीर च नशीब चांगलं होत की जिवंत घरी परतला.
त्यानंतर पोलिसांनी गणेशला ताब्यात घेतले होते, गणेश जवळ पैश्याची कमतरता व कर्ज झाल्याने त्याने हे पाऊल उचलले होते.
मात्र वीर च्या वडिलांनी माणुसकी दाखवीत तक्रार परत केली व गणेशला पोलिसांनी मुक्त केले. #News34Chandrapur
मात्र 2 महिन्यांनी गणेशने अभियंता मित्राचा विश्वासघात करीत त्याचं अपहरण करीत हत्या केली.
15 ते 20 वर्षांपूर्वी आकाश सिंग नामक मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती मात्र आकाशचे आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाही, या घटनेनंतर अशीच घटना उघडकीस आली आहे.
आरोपी गणेशने शुभमचा खून केला त्यावेळी शुभमने आरडाओरडा केला असेलचं, त्याचा आवाज कुणाला तरी ऐकू आला असेल, इतके दिवस शुभमचा मृतदेह अश्या अवस्थेत पडला होता तर त्या मृतदेहाची वास कुणाला आला असेल, या प्रकरणात अजून कोण आरोपी आहे का याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे व घुगूस पोलीस करीत आहे.
