चंद्रपूर - कोरोना काळाच्या आधीपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे, शिष्यवृत्ती तर सोडा प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना वेतनचं मिळत नाही आहे.
कोरोना काळात अभियांत्रिकी महाविद्यालय अक्षरशः बंद व्हायच्या मार्गावर आले, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थाचालक मात्र आम्ही मजेतच आहो असे दाखवीत आहे पण शिक्षक वृंद व त्यांच्या परिवारावर संस्था चालकांच्या या वृत्तीमुळे उपासमारीची पाळी आली आहे.
जिल्ह्यातील नामांकित असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिपाई व संस्था चालकात वेतनावरून मोठा वाद झाला, हा वाद इतका वाढला की शिपायाने संस्थाचालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न सुद्धा केला.
अनेक महिन्यापासून वेतन प्रलंबित असल्याने शिपाई व त्याचे कुटुंब उघड्यावर आले आणि त्याने स्वतः व संस्थाचालकाला जाळण्याचा निर्णय घेत, संस्थाचालकांच्या केबिन मध्ये जात स्वतःवर आधी पेट्रोल ओतले नंतर संस्थाचालकांच्या अंगावर मात्र तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सावधपणाने होणारा अनर्थ टळला.
अभियांत्रिकी महाविद्यालयाची बदनामी होऊ नये म्हणून या घटनेची पोलिसात तक्रार करण्यात आली नाही, ही घटना 13 फेब्रुवारीला 3 ते 4 वाजेदरम्यान घडली.
एकीकडे शिक्षक वेतनासाठी आंदोलन करीत आहे व संस्थाचालक मात्र ते उघडपणे बघत त्यावर साधी प्रतिक्रिया देणेही टाळतात.
