घुगूस - शहरातील चर्चित शुभम फुटाणे हत्याकांडातील मुख्य आरोपी गणेश पिंपळशेंडे यांच्या पोलीस कोठडीचा आज शेवटचा दिवस, घुगूस पोलीस गणेश विरोधात पुरावे गोळा करीत आहे.
शुभम जिवंत हवा तर 30 लाख रुपयांची खंडणी आरोपी गणेशने मागितली होती, मात्र आरोपी गणेशने शुभमला 17 जानेवारीला ठार केले, या हत्याकांडातील वापरण्यात आलेली कुऱ्हाड पोलिसांनी आज जप्त केली.
चंद्रपूर-घुगूस मार्गावर स्थित शांतीनगर परिसरातील पेट्रोल पंप समोर झुडपात आरोपी गणेशने कुऱ्हाड लपवून ठेवली होती.
आज घुगूस ला पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर व फॉरेन्सिक चमू सकाळपासून तपास करीत आहे.
विशेष म्हणजे शुभमचा मृतदेह, कुऱ्हाड व मोबाईल हे तिन्ही 1 किलोमीटर अंतरावर असून यामध्ये अजून कुणी सहभागी आहे का याचा शोध घुगूस पोलीस करीत आहे.
